राज्याचे सर्वाधिक गतिमान नेतृत्व...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी राजकारणासोबत विकासकामांच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवे समान असल्याचा मूलमंत्र त्यांनी आतापर्यंत जपला आहे. दादांनी विकासाच्या जोरावर राज्यामध्ये संघटना बळकट केली असून राज्यातील सर्वात गतिमान नेतृत्व बनले आहेत.
- प्रदीप गारटकर, अध्यक्ष : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पुणे जिल्हा
राजकारणातील पितामह व पवार कुंटूबाचे आधारवड शरदचंद्र पवारसाहेबांपासून अजितदादांनी राजकीय वारसा व समाजकारणाचा वसा घेतला. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर कॉग्रेसची विचारधारा वाढली होती. याच विचारधारेमध्ये दादांची जडणघडण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन दादा राज्याच्या राजकारण व समाजकारणामध्ये वेगाने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसमावेशक नेतृत्व तयार होत आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांपासून दादांच्या राजकीय कारर्किदीला सुरुवात झाली. सुरवातीला बारामती, इंदापूर परिसरामध्ये अनेक विकासाची कामे दादांनी मार्गी लावली. शेती व शेतीपूरक व्यवसाय स्वत: करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातले. दादांच्या करारी स्वभावामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेला. त्यांनी अनेक जिवाभावाचे मित्र व कार्यकर्ते जोडले. दादांच्या कामाच्या जोरावर जनतेने त्यांना विधानसभेमध्ये पाठवले. नंतर ते लोकसभेमध्ये निवडणूक गेले.
दादा अर्थखात्याचे जाणकार
राज्याच्या राजकारणामध्ये काम करीत असताना अनेक खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. अर्थखात्याचे जाणकार झाले. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. राज्यामध्ये सत्ता नसतानाही विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे बारामतीसह राज्याचा विकासाला चालना मिळाली. दादांना जनतेची नस ओळखली आहे. ते पहाटेच लवकर कामाला सुरवात करतात. जनतेसाठी अविरत काम करीत असतात. काम करीत असताना त्यांचे शरीर थकले तरीही मन मात्र थकत नाही. जनतेच्या प्रश्नाचे उत्तर सापडल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. जनतेची कामे वेळेमध्ये पूर्ण करण्यामध्ये त्यांचा कल असतो.
विकासाचे निर्णय घेऊन जलद अंमलबजावणी
राज्याच्या हिताचे व विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात. विकासाचे निर्णय जलद घेऊन अंमलबजावणी देखील तातडीने करतात. संघटना विचारांच्या व विकासाच्या जोरावर बांधता येते. हे राज्याला दाखवून दिले आहे. जनतेची सेवा ही ईश्वर सेवा मानून सेवेच्या आधारावर संघटनेला बळकट देण्याचा प्रयत्न आहे. वैचारिक परिवर्तनातून सत्ता येत असते व जातही असते. मात्र सेवा व विकासाच्या माध्यमातून बांधलेले संघटन हे कायमस्वरूपी भक्कमपणे पाठीशी उभे राहते हे दादांनी राज्यातील जनतेला दाखवून दिले आहे.
संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू
विविध क्षेत्रातीमध्ये सहकारी संस्था उभारून त्याला बळकटी देण्याचे काम करीत आहेत. कामामध्ये दादांना शिस्त प्रिय आहे. पक्ष संघटनेकडे दादांचे बारीक लक्ष असते. व्यस्त कामामध्येही संघटना वाढीसाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतो. संघटनेमध्ये काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोकळीक दिल्यामुळे संघटना वाढत आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरामध्ये अनेक सक्षम नेते,कार्यकर्ते उभे केले आहेत. दादांचा स्पष्ट बोलण्याचा व रोखठोक स्वभाव जनतेला आवडतो. या त्यांच्या स्वभावामुळे अनेकवेळा अडचणीमध्ये देखील येतात. नाराजीदेखील ओढून घेतात. परंतु त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल आकस नसतो. या त्यांच्या स्वभावामुळे स्वपक्षातील, विरोधी पक्षातील विविध सामाजिक संघटनेतील व प्रशासनामधील देखील लोक सहकार्य करीत असताना आपण त्यांना पाहत आहोत.
भारदस्त आवाज दादांना मिळालेली देणगी
सर्व राजकीय पक्ष त्यांच्यापुढे स्वभावामुळे अनेक प्रसंग उभे राहिले होते. पण त्यांच्यामधील खरा काम करणारा मनुष्य लक्षात आल्यामुळे आरोप करणाऱ्यांनी दादांना सहकार्य केल्याचे राज्याने पाहिले आहे. दादांना कमी काळामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली
आहे. भारदस्त आवाज ही दादांना मिळालेली परमेश्वराची देणगी आहे. येणाऱ्या काळामध्ये दादांसारख्या सक्षम नेतृत्वाची राज्याला गरज आहे. गतिमान विकासासाठी दादांसारखा मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. येणाऱ्या काळामध्ये अजितदादा मुख्यमंत्री होऊन दादांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना....
दादांना वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
राज्यातील संयमी नेता...
सध्या राजकारणामध्ये विविध पक्षातील मोठमोठे नेते एकमेकावर चिखलफेक करून अंगावर धावून जातानाही दिसत आहे. मात्र दादांचा स्वभाव आक्रमक असताना देखील अशा परिस्थितीमध्ये सर्व विचारांच्या लोकांचा योग्य सन्मान देवून सर्वांना बरोबर घेऊन जाणारे दादांचे नेतृत्व आहे. केवळ विरोधाला विरोध करणे व खालच्या पातळीवर टीका करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांची जनतेमध्ये लोकप्रियता वाढत चालली असून मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करीत आहेत.
(शब्दांकन - राजकुमार थोरात,वालचंदनगर)
05315, 05316
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.