अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा

Published on

वालचंदनगर, ता. २८ : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली.

भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता.२८) कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली. यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण, बाबासाहेब झगडे होते. यावेळी शेट्टी यांनी सांगितले की, राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मराठवाडा व पश्‍चिम विदर्भामध्ये ही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. काही ठिकाणी एका दिवसात ३०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. जमीन वाहून गेल्या आहेत. विहीर ढासळल्या आहेत. शेतांमधील ठिबक सिंचनासह विद्युत मोटारी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आहे. अनेक जनावरांचाही मृत्यू झाला आहे. राज्यातील सर्वाधिक नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलडाणा आदी जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भ पश्‍चिम महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांना अतिवृष्टी व महापुराचा फटका बसला होता. कापूस, सोयाबीन, उडीद, मका, पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याकाठी असणाऱ्या जमिनीमधील पिके पंचनामे करण्यासही शिल्लक राहिलेली नाहीत. खते, बि-बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, औषधे यांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

निर्यातीच्या धोरणामुळे बाजारभाव गडगडले
केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धोरण सतत बदलत असल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे, अशा परिस्थितीमध्ये शासनाने योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. पीक विम्याचे बदलेले आकडे पूर्ववत करणे गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे अपेक्षा राजू शेट्टी यांनी कृषिमंत्र्यांपुढे व्यक्त केली.


दहा दिवसांपासून राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना जास्तीजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- दत्तात्रेय भरणे, कृषिमंत्री


05412

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com