ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर करा

ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर करा

Published on

वालचंदनगर, ता. ९ ः ‘‘साखर कारखान्यांनी आगामी काळामध्ये हॉवेस्टरच्या (यांत्रिक ऊस तोडणी) माध्यमातून जास्तीजास्त ऊस तोडणीसाठी प्रयत्न करून वर्ष २०३०पर्यंत संपूर्ण उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे करावी,’’ असे आवाहन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये डॉ. कोलते बोलत होते. पुढे बोलताना कोलते म्हणाले, ‘‘साखर कारखान्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदल करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यामध्ये साखर निर्मिती करत असताना एआयचा वापर होत आहे. तसेच, ऊस उत्पादक शेतकरी एआय वापर करून उसाचे उत्पादन घेत आहेत. एआयचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन जास्तीजास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी कारखान्यांनी प्रयत्न करावेत. उसाची लागवड करताना टिशू कल्चरच्या रोपांची लागवड करावी.’’
यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यवस्थापक प्रशांत हेगडे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, माळेगावचे संचालक नितीन देसाई, छत्रपतीचे संचालक पृथ्वीराज घोलप, रामचंद्र निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, अॅड. शरद जामदार, अनिल काटे, मंथन कांबळे, विठ्ठलराव शिंगाडे, नीलेश टिळेकर, सुचिता सपकळ, प्रशांत दराडे, अशोक पाटील, संतोष मासाळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, सरव्यवस्थापक हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे उपस्थित होते.

‘छत्रपती’ची रिकव्हरी टॉप कारखान्यामध्ये
यावेळी साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे कौतुक करून त्यांचा अडचणींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न वाखण्याजोगा असल्याचे सांगितले. तसेच, टॉपच्या कारखान्याच्या रिकव्हरीमध्ये ‘छत्रपती’चा समावेश होत असून, सध्याची सरासरीची १०.९८ टक्के रिकव्हरी चांगली आहे. अशीच घौडदौड सुरू ठेवावी, असेही सांगितले.

छत्रपती सहकारी साखर कारखाना पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना असून, छत्रपतीने राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. २२ वर्षापूर्वी हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करणारा राज्यातील पहिला साखर कारखाना हा ‘छत्रपती’ आहे. सध्या कारखाना अडचणीमध्ये असला तरी ही अडचणींमधून कारखाना उभारी घेऊन पुन्हा उभा कसा राहू शकतो, हे राज्याला दाखवून देणार आहे.
- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना

05698

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com