लाडक्या बहिणी झाल्या पोरक्या
वालचंदनगर, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूमुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हरपला असून लाडक्या बहिणी पोरक्या झाल्या. महिलांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र वालचंदनगरमध्ये दिसून आले.
आपल्या कुंटूबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भावना महिलांची होती. ठिकठिकाणी दादांच्या आठवणीने नागरिक गहिवरले. बारामती, इंदापूरसह अनेक घरामध्ये टीव्ही वरील प्रसंग पाहून महिलांना अश्रू अनावर झाले. अनेक महिलांना दादा आपल्यामध्ये नाहीत असा विश्वास बसत नव्हता. यासंदर्भात बारामतीमधील महिलांना रोजगार निर्मिती करून देणाऱ्या पूजा शिंदे म्हणाल्या, ‘‘दादा आपल्यामध्ये नाहीत यावरती विश्वास बसत नाही. दादांनी बारामतीसह राज्यामध्ये केलेली विकासकामे पाहण्यासारखी आहेत. त्यांनी महिलांना विविध क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांच्या अकाली जाण्यामुळे विकासपुरुष हरपला आहे.’’ थोरातवाडीमधील प्रगतशील शेतकरी कीर्ती नगरे म्हणाल्या, ‘‘दादा वेळ काटेकोरपणे पाळत होते. काम होत असेल तर होय आणि नसेल तर ते नाही म्हणून सांगत होते. दादांमुळे अनेक महिलांना विविध क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे अनेक महिला सक्षम झाल्याचे आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

