‘छत्रपती’चे १०१ दिवसांत साडेसात लाख टन गाळप

‘छत्रपती’चे १०१ दिवसांत साडेसात लाख टन गाळप
Published on

वालचंदनगर, ता. १० : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १०१ दिवसांत सात लाख ५० हजार ४८५ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, अशी माहिती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
कारखान्याच्या गळीत हंगामास एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली तर नऊ फेब्रुवारीपर्यंत कारखान्याने १०१ दिवसांचा टप्पा पूर्ण केला. कारखान्याने १०१ दिवसांत सात लाख ५० हजार ४८५ टन उसाचे गाळप पूर्ण केले. आत्तापर्यंत आठ लाख ४७ हजार ८०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. उसाची नऊ फेब्रुवारीपर्यंत रिकव्हरी ११.८१ टक्के असून, सरासरी रिकव्हरी ११.३२ टक्के झाली आहे. कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून तीन कोटी ८४ लाख ४८ हजार १०० युनिट वीज निर्मिती केली आहे तर दोन कोटी ५२ लाख ४१ हजार युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अखेरच्या टप्पात आहे.

रिकव्हरी वाढल्याचा शेतकऱ्यांना फायदा
गतवर्षीच्या तुलनेमध्ये साखरेच्या उताऱ्यात (रिकव्हरी) चांगली वाढ झाली आहे. सरासरी रिकव्हरी ११.३२ टक्के झाली आहे. रिकव्हरी वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांना दिले १५० कोटी रुपये
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एक जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये गाळप झालेल्या उसाचे ३५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी (ता.१०) जमा केले असून आत्तापर्यंत छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे १५० कोटी जमा केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com