
वाल्हे शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात
वाल्हे, ता. २३ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी शुक्रवारी (ता. २०) आयोजित केलेला महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. मकरसंक्रांतीनिमित्त महिला पालकांकरिता हळदीकुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका पद्मा माळवदकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा दीपाली कुदळे, अर्चना पवार, संगीता भुजबळ, जयश्री कुंभार, शीतल पवार, प्राजक्ता गोंजारी, प्रतीक्षा कुंभार, नीता भुजबळ, स्मिता आगलावे, ज्योती आंबावले, रसिका पवार, कविता पवार उपस्थित होत्या. या वेळी महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. काही महिलांनी उखाणे घेतले. याप्रसंगी हळदी कुंकू देऊन वाण देण्यात आले. अस्मिता भागवत, मीनल खोडके, कीर्ती लिपारे, लालासो खुडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.