दौंडज प्राथमिक शाळचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दौंडज प्राथमिक शाळचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
Published on

वाल्हे, ता. २२ : ‘‘विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते,’’ असे मत दौंडजच्या सरपंच सीमा भुजबळ यांनी व्यक्त केले.

दौंडज (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरस्वती पूजन सरपंच सीमा भुजबळ तर कार्यक्रमाचे उदघाटन माजी सैनिक भगवान कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सरपंच भुजबळ बोलत होत्या. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी उपसरपंच अमोल कदम, रामदास भोसले, अनुजा कदम, अर्चना भोसले, विजय फाळके, मनोज कदम, किसन दगडे, रवींद्र कदम, कांचन कदम, संतोष शिंदे आदि उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका मनिषा म्हेत्रे यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये बक्षीस दिले. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली पावन खिंड नाटिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमप्रसंगी अक्षय कदम यांनी शाळेसाठी चार पंखे भेट दिले. सहशिक्षिका रूपाली पिसाळ, जयश्री पवार, नयन शिर्के, विक्रम फाळके, मधुकर इंदलकर, संतोष इंदलकर, उमेश इंदलकर, सोनाली घाडगे, पूजा कदम, पूजा दगडे, संध्या राजपुरे, अनिल चाचर आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
मनिषा फरांदे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com