

वाल्हे, ता. १६ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुरंदर तालुक्यातील चौथा आणि पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम वाल्हे येथे शनिवारी (ता. १७) होणार आहे. वैष्णवांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारीचे काम अंतिम टप्प्यात असून, ग्रामपंचायतीने १५ एकराचे प्रशस्त पटांगण
सज्ज केल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी एकच्या सुमारास पालखी सोहळा वाल्हे येथे दाखल होईल. गावाच्या वेशीवर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. जागोजागी अन्नदान व फराळ, चहा वाटप कार्यक्रमांसाठी मंडप उभारले आहेत. वाल्हेजवळील सुकलवाडी फाट्यावरील पालखी मुक्कामाची
ग्रामपंचायतीकडून तयारी पुर्ण झाली असून, सोहळ्यातील वैष्णवांसाठी पाणी, आरोग्य, विद्युत पुरवठा याबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे.
वाल्हे परिसरातील वाड्यावस्त्यांसह सुकलवाडी, कामठवाडी परिसरामध्ये पालखीसोहळा विसावला जातो. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावठाणासह परिसरातील सर्व विहिरी व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून त्यामध्ये टीसीएल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत पालखीतळावर आवश्यक ठिकणी मुरमीकरण करून सपाटीकरण करून वाळू व कच टाकून सुशोभीकरण केले आहे. वीज व्यवस्थेसाठी मनोरे उभारले आहेत. परंपरेनुसार प्रवेशमार्गावर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत कमानी उभारल्या आहेत.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावातील हॉटेल, दुकानदार यांना पदार्थ उघडे ठेऊ नये व पाणी स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासदंर्भात सूचना करून त्यांची तपासणी केल्याचे वाल्हे प्राथमिक
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी सांगितले. पालखीतळ परिसर व गावामध्ये आवश्यक ठिकाणी शौचालयाचे युनिट व ठिकठिकाणी लाइट व पाण्याची सोय, तसेच वारकऱ्यांचे टॅंकर भरण्यासाठी ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध केल्याचे ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी
सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.