दौंडजला स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन

दौंडजला स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन

वाल्हे, ता. ३ : दौंडज (ता. पुरंदर) येथील स्वामी समर्थ अनंत मठामध्ये ''दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा''च्या जयघोषात स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन करून गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिर परिसरामध्ये रंगीबेरंगी फुग्यांची आरास करण्यात आली होती.
सदगुरू अनंत पोतदार महाराजांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता महाभिषेक, आठ वाजता श्री दत्त गायश्री व स्वामी गायश्री यज्ञ झाला. दहा ते बाराच्या दरम्यान गुरू पूजन सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर दौंडज येथील ज्ञानराज भजनी मंडळाच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी श्रींची पालखी
प्रदक्षिणा झाल्यानंतर शेजारती व सायंकाळी महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर काकडआरती, दत्तयाग, प्रवचन, पारायण, आरती, श्रींची पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम उत्साहात झाले. विवेक देशपांडे यांनी पौराहित्य केले. मठामध्ये दर सोमवारी अन्नदान केले जात असल्याचे प्रियांक भुजबळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com