वाल्हेत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी देवीचा हळद समारंभ संपन्न

वाल्हेत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी देवीचा हळद समारंभ संपन्न

वाल्हे, ता. ३० : वाल्हे (ता. पुरंदर) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांच्या चैत्री उत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (दि.३०) पारंपारिक पद्धतीने उत्सवमूर्तींना हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला. यावेळी उत्सवमूर्तींना हळद लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रा उत्सवानिमित्त मंदिरात फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. बुधवारी (ता. १) अष्टमीला यात्रेचा मुख्य दिवस असून श्री भैरवनाथ व देवी जोगेश्वरी यांचा अलौकिक विवाहसोहळा सायंकाळी साडेसहा वाजता पार
पडणार आहे. मंगळवारी (दि. ३०) पहाटे महापूजा, अभिषेक, महाआरती आदि धार्मिक विधी पार पडले तर सायंकाळी साडेपाच वाजता हळदीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. वाजत-गाजत देवाची हळद व मंडवळ्या मंदिरात आणण्यात आल्या. विधीवत पूजा होऊन मानकऱ्यांनी सनई चौघड्याच्या निनादात मंगलमय वातावरणामध्ये पारंपारिक पद्धतीने उत्सवमूर्तींना नविन पोशाख परिधान केल्यानंतर देवाला मंडवळी बांधल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये हळदी लावली.

यावेळी शीतल भुजबळ, अनिता भुजबळ, रेखा भुजबळ, सायरी बनकर, पूर्वा राऊत, आदिती भुजबळ, अनुराधा पाटील, शैलजा शेलार, अनुराधा पवार, मैथिली भुजबळ, सृष्टी भुजबळ, अलका पवार, साधना पवार, मुक्ता भोसले, ऊर्मिला भोसले, स्नेहल पोटे, शोभा पवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामदैवत पालखीसह मानाच्या काठ्यांच्या मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर ढोल-ताशा व सनईच्या निनादात तरुणवर्ग मोठ्या उल्हासात नाचत होते. तसेच नाथ साहेबाचं चांगभलं च्या जयघोषाने संपूर्ण छबिना रंगून गेला होता. चैत्री उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरामध्ये पोलिसांच्या सूचनेनुसार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com