बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

वाल्हे, ता.१०: मांडकी (ता.पुरंदर) येथील दत्तात्रेय संपत जगताप यांच्या आमराळा शेतामध्ये बुधवारी (ता. ८) बिबट्याने प्रवेश करून एका बोकडाचा फडशा पाडला. बिबट्याचे परिसरात वारंवार होणारे हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे त्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दत्तात्रेय जगताप यांसह नागरिकांना सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज आला असता आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी बिबट्याने बोकडाला ठार केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिस पाटील श्रीतेज जगताप यांनी वनविभागाला कळविले असता वनपाल राहुल रासकर, वनरक्षक जी. आर. निरडे, पोपटराव
कोळी, एस. व्ही. बागल, पी.एस. खोमणे आदींनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.
याबाबत बोलताना वनपाल राहुल रासकर म्हणाले कि, बिबट्या पुन्हा शिकार करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क
राहावे. घटनेचा पंचनामा केला असून शवविच्छेदनानंतर अहवाल वनविभागाला देऊन सदर शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com