वाल्हे येथील पालखीतळाची प्रशासनाकडून पाहणी

वाल्हे येथील पालखीतळाची प्रशासनाकडून पाहणी

वाल्हे, ता. १३ : वाल्हे (ता.पुरंदर) नजीक सुकलवाडी फाट्याशेजारी प्रांगणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (ता. ७ जुलै) विसावणार आहे. त्या
पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मुक्कामाची पूर्वतयारी म्हणून आज सोमवार (ता. १३) पुरंदर प्रशासनाकडून वाल्हे येथील पालखीतळाची पाहणी करून माहिती घेऊन
त्रुटींबाबत मार्गदर्शन केले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हे येथील पालखीतळावर भाविकांसाठी दर्शनबारी, दिंड्या व भाविकांना पालखीतळावर येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग, रांगेतील दर्शन व्यवस्था, पालखी रथ येण्याचे मुख्य ठिकाण, बैठक व्यवस्था, नीरा स्नान दरम्यान जाणारा पर्यायी मार्ग आदींची पाहणी पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांगडे यांसह तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ.अमित पवार यांनी केली. यावेळी सरपंच अतुल गायकवाड, हनुमंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वाती दहिवाल, महावितरणचे आनंद पवार, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, मंडळ अधिकारी भारत भिसे, तलाठी संजय उमाप, हमीद शेख, रमेश पवार आदि उपस्थित होते.

यावेळी सरपंच अतुल गायकवाड यांनी पालखी तळाशेजारील भुयारी मार्गामध्ये लाईटची सुविधा तसेच भुयारी मार्गाच्या दुतर्फा संरक्षण भिंतीची मागणी केली. तर वाल्हे मुक्कामानंतर निरेकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीबाबतची मागणी हनुमंत पवार यांनी केली. याबाबत गटविकास अधिकारी डॉ.अमित पवार यांनी या पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
दरम्यान, भुयारी मार्गातील कडेच्या भिंतीवरून पावसाचे पाणी जाऊन या भिंत जीर्ण होऊन यांची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने याबाबत प्रांताधिकारी यांनी नाराजी व्यक्त करत या कामकाजाबाबत ग्रामपंचायतीने तत्काळ आपणास पत्रव्यवहार करण्याबाबत सूचना करून पालखीपूर्वी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.सरपंच अतुल गायकवाड यांनी आभार मानले.

03003

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com