वाल्हे येथे ड्रोनमुळे घिरट्यांमुळे ग्रामस्थ भयभीत

वाल्हे येथे ड्रोनमुळे घिरट्यांमुळे ग्रामस्थ भयभीत

वाल्हे, ता.२ : वाल्हे परिसर तसेच बाजारपेठेमध्ये (ता. पुरंदर) रात्रीच्या वेळेस आकाशात कुठे ना कुठे दोन ड्रोन घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबाबत सतर्क राहून ड्रोन दिसल्यास पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचोरे यांच्याकडून केले आहे.
ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात हे समजत नसल्याने परिसरात दहशत पसरली आहे. रात्री बाजारपेठेमध्ये अचानक दोन ड्रोन दोन ठिकाणी घिरट्या घालू लागल्याचे ग्रामस्थांना दिसले. यावेळी तरुणांनी रस्त्यावर येत ड्रोनच्या मागे पळापळ केली. मात्र, जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांच्या घिरट्यानंतर ड्रोन उडत उडत अवकाशात गायब झाल्याने रात्री उशिरापर्यंत तरुणांनी जागता पहारा ठेवला होता. रात्रीच्या वेळीस ड्रोन नेमके कोण व कशासाठी उडवत आहे? याच्या सहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही ना? आदी प्रश्नांबाबत उलट-सुलट चर्चा रविवारी (ता.२) दिवसभर याची तरुणांमध्ये चांगलीच झडत होती.


ड्रोन कॅमेरे आणि चोरीच्या घटना यात काही संबंध नाही. सध्या ड्रोनची सुरू असलेली चर्चा निष्फळ आहे. आकाशात फिरणारे हे ड्रोन नसून, बारामती हवाई उड्डाणावरील सरावाची विमाने आहेत. चार दिवस बारामती येथील शिकाऊ विमानांची उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. ड्रोनबाबत जामरची व्यवस्था केली आहे. रात्रीच्या वेळेस ज्या ठिकाणी ड्रोन फिरेन त्या ठिकाणी जामरच्या सहाय्याने ते ड्रोन खाली पाडण्यात येणार आहे.
- दीपक वाकचौरे, पोलिस निरीक्षक, जेजुरी पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com