वाल्हेत भवानीमाता मंदिरात भाविकांची गर्दी

वाल्हेत भवानीमाता मंदिरात भाविकांची गर्दी

Published on

वाल्हे, ता. ९ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील शिवकालीन श्री भवानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मानकरी, गावकरी, भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. शिवकालापासुन भवानीमातेच्या नवरात्रोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. विशेष म्हणजे वाल्हे पंचक्रोशीतील महिला नऊ दिवस श्रद्धेने भवानीमातेची आराधना करतात.
वाल्हे गावच्या पुर्वेकडील उंच डोंगरावर शिवकालीन जागृत भवानीमातेचे मंदिर आहे. मंदिर परिसराचा जीर्णोद्धार सुरू असून नुकतेच मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाल्याने मंदिर परिसरातील विविध विकासकामांनी मंदिराचे रूप पालटले आहे. नवरात्रीमध्ये भाविक पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. मंदिर परिसराचा जीर्णोद्धार सुरू झाल्याने वनविभागाने कच्चा रस्ता तयार केल्याने दुचाकीसह चारचाकी डोंगरावर येऊ लागल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील भाविकांचीही गर्दी होत आहे. या मंदिरात नवरात्रात नऊ दिवस देवीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.
वाल्हे येथील भोसले कुटुंबीयांकडे या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरपरिसरामध्ये आकर्षक पानाफुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. नवरात्रात पहाटे साडेपाच वाजता पूजा, जागर, काकडा, आरती, पालखी प्रदक्षिणा, देवीची गाणी, भजन, अष्टमीला होम आदी कार्यक्रम असतात. नवरात्रीनिमित्त डोंगरावरील या मंदिरामध्ये पहाटे साडेपाच वाजता आरतीसाठी भाविक वाढू लागले असून नवरात्रातील पाचव्या व सहाव्यामाळेपासून पुढे या मंदिरात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. मंदिर परिसरामध्ये केलेल्या आकर्षक सजावटीने भवानीमातेची मूर्ती आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी आलेल्या भाविकांना चहा, खिचडी, केळी, राजगिरा चिक्की आदींचे वाटप सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com