कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकीस्वारांची हवा काढणार कोण?
वाल्हे, ता. १२ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे बुलेटसह इतर दुचाकी सायलेंसरच्या पुंगळ्या काढून किंवा बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्यांचे आवाज काढून सुसाट धावत हवा करणारे दुचाकीस्वार वाढले आहेत. जुन्या दुचाकीचे सायलन्सर काढून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची हवा आता नक्की कोणी काढणार असा प्रश्न भेडसावत आहे.
या बुलेटच्या कर्णकर्कश कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे दुष्परिणाम आबालवृद्धांसह शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांवर होत आहेत. या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होत असताना फटफट आवाजासह दुचाकींचे सायलन्सर काढून गावांतर्गत सुसाट धावणाऱ्या बुलेटधारकांसमोर पोलिसांचा हात आडवा होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत असताना दरवाढीने वाहने वापरावीत की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. दुसरीकडे मात्र काहीही कारण नसताना केवळ रुबाब व हवा करण्यासाठी काही जण दुचाकी फिरवत राहतात. त्यातही नव्यानेच बुलेटस्वारांनी कहर केल्याचे दिसून येत आहे. या कर्णकर्कश आवाजाचे शाळा, महाविद्यालय किंवा शांत ठिकाण परिसरातून जात असताना याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होऊ लागल्याने कारवाईची मोहीम पोलिस प्रशासनाने हाती घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या दुचाकीस्वारांना पोलिसांनी कारवाईचा हिसका दाखवावा, अशी मागणी असल्याचे भालचंद्र भुजबळ व सुधाकर पवार यांनी सांगितले.
नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन त्रास होईल अशा पद्धतीची वर्तणूक करणाऱ्यांवर तातडीने मोहिमेचे नियोजन करून संबंधितांना योग्य ती समज देऊन कारवाईची मोहीम राबवली जाईल.
-दीपक वाकचौरे, पोलिस निरीक्षक, जेजुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

