खोलीकरणामुळे होणार दुष्काळावर कायमस्वरूपी मात

खोलीकरणामुळे होणार दुष्काळावर कायमस्वरूपी मात
Published on

वाल्हे, ता.४ : पिंगोरी (ता.पुरंदर) येथे पानी फाउंडेशन व सेट्रीज कंपनीच्या माध्यमातून जय गणेश जलाशयातील खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ रविवारी (ता.२) करण्यात आला. जलाशयाचे पुन्हा पुनर्रूज्जीवन होणार असल्याने पाणी साठवणुकीत मोठी वाढ होणार आहे. जलसंधारणाच्या कामामुळे जलस्रोत बळकट होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. यामुळे दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे शक्य होणार असल्याची बोलकी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

पुढील तीन महिने हे गाळ काढण्याचे काम सुरू असणार आहे. हा गाळ काढल्यामुळे पिंगोरीसह परिसरातील वाड्यावस्त्यांवरील जलस्त्रोतांना याचा फायदा होणार आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी खोलीकरणाचा मोठा फायदा होणार आहे, असे सरपंच संदीप यादव व बाबा शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामस्थांच्या एकजुटीला पाठबळ देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने या जलाशयातील गाळ करण्यात आला होता. यामुळे पिंगोरीकरांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली होती. आता पुन्हा तब्बल अकरा वर्षानंतर उर्वरित गाळ काढण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

याप्रसंगी पानी फाउंडेशनचे मयूर साळुंखे, सेट्रीजचे ऋषिकेश माने, कैलास गायकवाड, धनंजय शिंदे, नीलेश शिंदे, सिनेअभिनेते विनोद शिंदे, प्रकाश शिंदे, गोविंद शिंदे, श्यामराव शिंदे, कल्याण धुमाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, अमोल शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

04218

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com