वडिलांची रक्षा विसर्जन करून दिला दहावीचा पेपर

वडिलांची रक्षा विसर्जन करून दिला दहावीचा पेपर
Published on

वाल्हे, ता. १० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील साहिल सचिन भोसले या विद्यार्थ्याची दहावीची परीक्षा सुरू असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्याने साहिलवर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांचे निधन झाले तरी भावनांना आवर घालून कुटुंबीयांच्या साथीने व शिक्षकांच्या धीराने साहिलने दहावीचा पेपर देत न खचण्याचा संदेश देत त्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.
साहिल हा मुलगा आई, बहिण व आजीसोबत राहत आहे. तो रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये शिकत आहे. वडील सचिन भोसले हे मालवाहतूक गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. स्वतःवर अनुभवलेले दिवस मुलांवर येऊ नये म्हणून मुलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे, हा त्यांचा ध्यास होता.
साहिलला ते अभ्यासासाठी नेहमीच प्रेरित करत होते. आपल्या मुलाने शिकून ही परिस्थिती बदलावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच भोसले कुटुंबावर नियतीने घाला घातला. रविवारी (ता. ९) सचिन भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडील गेल्यामुळे साहिलवर दु:खाचा डोंगर कोसळला. पेपरचा वेळ आणि त्यातच वडिलांचे निधन असा दु:खाचा डोंगर उभा असताना परीक्षा द्यायची कशी? असा मोठा प्रश्न साहिलसमोर उभा राहिला.
विद्यालयातील शिक्षकांनी घरी जाऊन त्याचे सांत्वन केले. परीक्षा देऊन वडिलांना खरी श्रद्धांजली देण्याबाबतचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर साहिल अखेर परीक्षेसाठी तयार झाला. सोमवारी (ता. १०) सकाळी वडिलांचा रक्षा विसर्जन विधी झाल्यानंतर साहिलने परीक्षा केंद्र गाठले आणि साश्रुनयनाने विज्ञान १ विषयाचा पेपर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com