

वाल्हे, ता.३० : ‘पालवी चैत्राची अथांग स्नेहाची’, ‘जपणूक परंपरेची, उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची’, ‘उन्नतेची आणि स्वप्नपूर्तीची’ अशा एकमेकांना शुभेच्छा देत
वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये रविवारी (ता.३०) गुढीपाडवा पारंपरिक उत्साहात साजरा झाला.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस व साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण परिसरात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज घरोघरी मांगल्य आणि समृद्धीची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त आज सकाळपासुनच घरोघरी तयारी सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी महिलांनी पहाटेपासून दारात सडा टाकून रांगोळ्या सजल्या आणि उगवतीच्या सूर्याच्या साक्षीने घरोघरी लाकडी काठीला नवरीसारखे नटवून गुढ्या उभारल्या गेल्या. यानिमित्ताने सारे कुटुंब एकवटले आणि गुढीची पारंपारिक पद्धतीने मनोभावे पूजा करण्यात आली. त्यानंतर मित्र परिवार व नातेवाईकांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पुरणपोळीचा आस्वाद घेतला.
04366
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.