

वाल्हे, ता. ९ : ‘‘शेतकऱ्यांना सर्वाधिक पीककर्ज वाटप करण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून जिल्हा बॅंकेस देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांहून अधिक पीक कर्ज वाटप करण्यास आम्हाला नेहमीच यश आले आहे. यंदाही देण्यात येणाऱ्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप निश्चित केले जाईल,’’ असे प्रतिपादन बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वाल्हे (ता. पुरंदर) शाखेचा शनिवारी (ता. ५) ५५वा वर्धापनदिन ग्राहकांच्या उपस्थितीत केक कापून व पेढे वाटून साजरा केला. यावेळी अध्यक्ष प्रा. दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी भाजपचे ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सचिन लंबाते, गिरीश पवार, सूर्यकांत पवार, मनोज भुजबळ, सागर भुजबळ, तेजस दुर्गाडे, प्रताप इंदलकर, कैलास गायकवाड, मारुती पवार, सोमनाथ गायकवाड, राजेश कुदळे, राहुल जाधव, अनिता भुजबळ, सविता भुजबळ आदी उपस्थित होते.
या शाखेमध्ये सुमारे १६ हजार २५४ खातेदार ग्राहक आहेत. तसेच, ४४ कोटी ८ लाखापर्यंत ग्राहकांच्या ऐच्छिक ठेवी आहेत. या शाखेअंतर्गत सहा सोसायट्यांमार्फत शेती, तसेच व्यावसायिक, वैयक्तिक व वाहन असे एकूण २२ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून, शाखेला १ कोटी ४३ लाख रुपये नफा झाल्याची माहिती पुरंदर तालुका विभागीय अधिकारी महेश खैरे व शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे यांनी दिली.
वाल्हे शाखेतील तरन्नुम आतार, पवन दुर्गाडे, नीलिमा लांडगे, अनिल पवार, अभिजित पवार, महेश पवार, दादासाहेब मदने, मकरंद चव्हाण, विकास भुजबळ आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. विकास अधिकारी मयूर भुजबळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.