वरुणराजाची वाल्हे परिसराला हुलकावणी
वाल्हे, ता.११ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा असताना गेले तीन दिवस सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. दुपारी उष्मा वाढला आणि जोरदार वाराही सुटला, मात्र ढगांनी भरलेले आकाश बघता-बघता निरभ्र होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने परिसराला हुलकावणी दिली आहे.
बहुसंख्य भागात पाऊस न झाल्याने पिके कोमेजली असल्याने शेतकरीवर्ग मात्र हवालदिल झाला आहे. गेले अनेक दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. उष्णतेत वाढ होऊ लागल्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली आहे. उन्हाचा सामना करणे जिकिरीचे झाल्याने उन्हापासून मुक्तता मिळावी यासाठी पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. या कालावधीत ढगाळ वातावरण होते दोन दिवस मळभ असल्याने पावसाची शक्यताही होती. मात्र त्यानंतर वाढत्या तापमानाबरोबर उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळीही तापमान वाढलेले असल्याने उकाडा कायम आहे.
मार्च ते मे हा काळ म्हणजे वळवाचा पावसाचा काळ समजला जातो. या पावसामुळे जेवढा फायदा होतो तेवढाच उभ्या पिकांना नुकसानकारक असतो. मे महिन्यात येणाऱ्या वळवाच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीसाठी मोठा फायदा होतो. यंदा मात्र वेगळी परिस्थिती दिसून येत आहे. मे महिन्याचे दोन आठवडे उलटले तरी मॉन्सूनपूर्व वळवाच्या पावसाचे आगमन झालेले नसल्याने बळिराजा चिंताग्रस्त दिसून येत आहे.
नाले-बंधारे, तलाव पडले कोरडेठाक
वाल्हे परिसरासह आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, दौंडज. पिंगोरी आदि परिसरामध्ये उन्हाळी हंगामातील पिकांची स्थिती दयनीय झाली असून नाले-बंधारे, तलाव कोरडेठाक पडलेले तर विहिरी, बोअरवेल यांची भुजलपातळी खोलवर गेल्याने पशुधन जगवायचे की कसेबसे हातातोंडाळी आणलेले पीक या चिंतेत शेतकरी आहे.
04536
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.