

वाल्हे, ता. २३ : जेजुरी (ता. पुरंदर) येथील औद्योगिक वसाहतीमधील अलोक इंडस्ट्रीज या कंपनीमधून चोरट्यांनी उच्च प्रतीच्या लोखंडाचे बार चोरून नेले होते. चोरीला गेलेल्या या लोखंडी बारची किंमत जवळपास १६ लाख रुपये होती. नुकतेच पोलिसांनी हे बार चोरी करणाऱ्या पाच जणांना पकडले आहे.
या सर्व आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गोपाळ बुलाकीदास लड्डा यांची अलोक इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. तेथे उच्च प्रतीच्या लोखंडापासून विविध उत्पादने तयार केली जातात. लड्डा यांनी १६ मे रोजी याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत जेजुरी पोलिसांनी पथकासह घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेजुरीत राहणाऱ्या ज्ञानेश्वर मिनीनाथ कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा
कबूल करून इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी राहुल संतोष वाघरी, ऋषभ राम चव्हाण, अमित सुरेश वाघरी, पवन जगन्नाथ पोतदार (सर्व राहणार जेजुरी) यांना अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर १६ लाखांपैकी आठ लाख ९५ हजार ६८५ रुपये किमतीचे लोखंडी बार त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन व एक दुचाकी हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.