

वाल्हे, ता.२५ : पुरंदर तालुक्याच्या ज्या गावांमधून गुंजवणी योजनेचे लाभक्षेत्र आहे. त्या गावांमधील सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात
न घेता संबंधित अधिकाऱ्यांकडून मर्जीप्रमाणे काम व सर्वेक्षण सुरू केल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. अखेरीस रविवारी (ता.२५) वाल्हेसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्र येत जलवाहिनीचे काम बंद पाडले. या पवित्र्यामुळे योजनाकर्त्यांना दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत.
गुंजवणी योजनेबाबत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. शेतकऱ्यांना या योजनेबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध न करताच संबंधित कंपनीने काम सुरू केल्याने गावातील व परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. वाल्हे (ता.पुरंदर) येथील श्रीकृष्ण मठामध्ये रविवार (ता. २५) बैठकीचे आयोजन केले. याबैठकीमध्ये फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, सूर्यकांत पवार, बाळासाहेब भुजबळ, संभाजी पवार, समदास राऊत, शांताराम पवार, उमेश पवार, विक्रमसिंह भोसले, सचिन देशपांडे, किरण कुमठेकर, पोपट पवार, कांतिलाल भुजबळ, राजसिंह पवार, रोहिदास राऊत, माणिक महाराज पवार, विठ्ठल पवार, विशाल पवार, योगेश पवार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुंजवणी धरणातून वाल्ह्यासह परिसराला बंद जलवाहिनीतून ठिबक सिंचनद्वारेपाणी मिळणार आहे. मात्र संबंधित काम दिलेल्या कंपनीने मर्जीनुसार सर्वेक्षण केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली. यापूर्वी १९९३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार जर जलवाहिनी केली तर वाल्हेच्या पश्चिम-उत्तर कडील परिसरासह बापसाईवस्ती, वागदरवाडी, राख, सुकलवाडीसह गावापर्यंत सर्व शिवार पाण्याखाली येऊ शकते. मात्र सध्याच्या सर्वेमध्ये अधिकाऱ्यांनी याचा कोणताही विचार
केलेला दिसत नाही. त्याला पर्याय म्हणून धरण भरल्यानंतर वाया जाणारे पाणी वाल्हे गावच्या पश्चिम -उत्तर दिशेने ओढ्या-नाल्यात सोडल्यास या मार्गातील सर्व बंधारे भरून पाणी शिवाराच्या पिसुर्टीपर्यंतच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना याचा दुहेरी फायदा होणार आहे.
पुरंदर योजनेअंतर्गत शिवारातील किती क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून जलवाहिनी जाणार त्यांना शासकीय नियमानुसार किती नुकसान भरपाई मिळणार तसेच या योजनेचा नकाशा उपलब्ध व्हावा आदी प्रमुख प्रश्न उपस्थित करत झालेला सर्वे आम्हाला मान्य नसल्याचे ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितले.
येत्या १० जूनला प्राणांतिक उपोषण
चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम बंद पाडल्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये १९९३ च्या सर्व्हे काम सुरू न झाल्यास येत्या १० जून रोजी वाल्हे
ग्रामदैवत मंदिरामध्ये सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी एकमुखाने दिला.
04586
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.