गुंजवणीच्या पाण्यावरून पुरंदरमध्ये राजकारण

गुंजवणीच्या पाण्यावरून पुरंदरमध्ये राजकारण

Published on

वाल्हे, ता.३० : गुंजवणीच्या पाण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदरमध्ये राजकारण खेळले जात आहे. त्यातच आता ही योजना पूर्णत्वास जात असताना मूळ योजनेत फेरबदल केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळणे दुरापास्त झाले असताना अधिकच्या गावांचा त्यातील समावेश हेच मोठे राजकारण असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाल्हे परिसरातील बाधित शेतकऱ्यांकडून उमटल्या जात आहे.

गुंजवणी प्रकल्पाचे काम पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता स्वत:च्या मर्जीप्रमाणे व चुकीच्या पद्धतीने चालवले असल्याचा आरोप करत दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी वाल्हे परिसरात सुरू असलेले काम बंद पाडले होते. त्या पार्श्वभूमीवर वाल्हे (ता.पुरंदर) येथे बुधवारी (ता. २८) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नीरा देवधर प्रकल्प सांगवी विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडूलकर यांच्या उपस्थितीत गुंजवणी प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता नयन गिरमे यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

एक दोन नव्हे तर तब्बल ३० वर्षे झाले आमच्या उताऱ्यांवर गुंजवणी प्रकल्पाचे शिक्के मारून ठेवलेत. योजना पूर्णत्वाला जात असताना मात्र त्या पाणीवाटपात राजकारण केले जात आहे. मूळ योजनेत बदल करून परिंचे भागातील क्षेत्र वाढवून नारायणपूर भागातील गावे या योजनेत समाविष्ट केली आहेत. अधिकारी या भागातील सर्व क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचे तोंडी उत्तरे देत आहेत. पण कागदोपत्री कोणती गावे व किती क्षेत्र भिजवणार हे दाखवायची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वाल्हे येथील शेतकऱ्यांनी केला. १९९३ च्या सर्व्हेनुसार काम न झाल्यास तसेच या योजनेच्या बाबतीत ठोस लिखित कागदपत्रे देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन न केल्यास, गुंजवणीचे काम होऊ देणार नाही., असा इशारा वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

बैठकीला भाजपचे सचिन लंबाते, अॅड. फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, सूर्यकांत पवार, अमोल खवले, समदास राऊत, विक्रमसिंह भोसले, कांतिलाल भुजबळ, उमेश पवार, रणसिंग पवार, बजरंग पवार, मोहन पवार, नीलेश पवार आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प होणे गरज
जुन्या सर्व्हेनुसार वाल्हेच्या पश्चिम-उत्तर कडील परिसरासह बापसाईवस्ती, वागदरवाडी, राख, सुकलवाडीसह गावापर्यंतची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पावित्रा घेतला असल्याचे सचिन लंबाते, अॅड. फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत यांनी सांगितले. तर या प्रकल्पाअंतर्गत झालेल्या सर्व्हेनुसार वाल्हे परिसरातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे संभाजी पवार, महेंद्र पवार, सूर्यकांत पवार, सागर भुजबळ, संदेश पवार यांनी सांगितले.

04617

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com