बंद जलवाहिनीचे भूत शेतकऱ्यांच्या माथी
वाल्हे, ता.१५ : वाल्हेपासून राखपर्यंतच्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचा तिढा वाढत चालला आहे. पाटपद्धतीने हे पाणी वाल्हे पश्चिम-उत्तर दिशेने होणाऱ्या प्रकल्पामध्ये बदल करत योजना पूर्णत्वास येत असताना जुना सर्व्हे बाजूला रेटत इतर गावे समाविष्ट करत बंद जलवाहिनीचे भूत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी अखेर शनिवारी (ता.१४) गुंजवणीप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत वागदरवाडी व वाल्हे येथे बैठक झाली. मात्र. शिवतारे यांनी शेतकऱ्यांचे सविस्तर म्हणणे एकूण न घेता १९९३ च्या सर्व्हेनुसार प्रकल्प होणार नसल्याची तंबी दिल्याने ही बैठक शेतकऱ्यांसाठी होती की ठेकेदार कंपनीसाठी असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी गुंजवणी प्रकल्प अधिकारी, प्रशासन शिवतारे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
शेतकरी आणि प्रशासनात वाद होत असल्याने कामाला गती मिळत नव्हती. यामुळे शनिवारी वाल्हे व वागदरवाडी येथे शिवतारे यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडूलकर व सहाय्यक अभियंता नयन गिरमे यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास तासभर चालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांना बगल देत पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी बैठक रेटण्याचा प्रयत्न केला. तासभर चर्चा केल्यानंतरही सकारात्मक पर्याय अधिकारी देऊ न शकल्याने अखेर गुंजवणीबाबतच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. या बैठकीला जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, अतुल म्हस्के, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, सागर भुजबळ,राहुल यादव, अथर्व पवार, सचिन पवार, कांतिलाल भुजबळ, सूर्यकांत पवार, अमोल खवले, संभाजी पवार, महेंद्र पवार, अतिश जगताप आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सकारात्मक मार्ग न निघाल्याने अखेर जोपर्यंत जुन्या सर्व्हेनुसार वाल्हेच्या पश्चिम-उत्तर कडील परिसरासह बापसाईवस्ती, वागदरवाडी, राख, सुकलवाडीसह गावापर्यंतची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला असल्याचे अॅड. फत्तेसिंग पवार, सुनील कदम, राजसिंह पवार, बाळासाहेब राऊत आदींसह शेतकऱ्यांनी एकमुखाने सांगितले.
बैठक म्हणजे निव्वळ फार्स
बैठक कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या तंबीमुळे निष्फळ ठरली. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे धुडकावून लावण्याचा एककलमी कार्यक्रम या बैठकीत पार पडन लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांची बाजू एकूण न घेता कंपनीची बाजू पुढे रेटली. त्यामुळे आजची बैठक म्हणजे निव्वळ फार्स ठरल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.
गुन्हे दाखल करणार असल्याचे उडाली खळबळ
शेतकरी बैठकीत शेतकरी काम बंद ठेवण्यावर ठाम असल्याने अखेर जाता-जाता आमदार विजय शिवतारे यांनी जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांना जर येथून पुढे शेतकऱ्यांनी काम सुरू करू दिले नाही तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करू असे सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
04686
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.