वाल्ह्यात विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणूक
वाल्हे, ता. १६ : वाल्हे(ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये यावर्षी नवागतांचे स्वागत असेच पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशद्वाराजवळ दुतर्फा रांगोळीच्या पायघड्या अंथरूण सजविलेल्या घोड्यावर बसवून पुष्पवृष्टी, औक्षण करून विद्यालयातील पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला.
विद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या नवागतांचे प्रवेशद्वारापासून संतोष गायकवाड यांनी आकर्षक सजविलेल्या घोड्यावर बसवून स्वागत केले. मिरवणुकीनंतर भाजपचे ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन लंबाते, सरपंच अतुल गायकवाड, माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी गीतांजली मोरे, शैला गवारी, प्रियांका कणेरे या महिला शिक्षकांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या अनोख्या स्वागताने मुलांचे चेहरे खुलल्याचे दिसून आले. याप्रसंगी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते, पर्यवेक्षिका नाझनीन अत्तार, अशोक महाराज पवार, सागर भुजबळ, तेजस दुर्गाडे, सचिन जाधव, संदीप पवार, विनोद पवार, कविता पवार, विनय शहा, सागर दुर्गाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अनिल दुर्गाडे, लक्ष्मण भालसिंग, दत्तात्रेय टिळेकर, सतीश अधिकारी, संदीप जाधव, संतोष जगदाळे, सुनील ढवळे, नीता कांबळे, मोहन गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे आदींनी केले. विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घोडके यांनी सूत्रसंचालन, तर संजय निर्मळ यांनी आभार मानले.
WHL25B04703
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.