
वाल्हे, ता.२४ : वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरात जलयुक्त शिवार, रसिकलाल धारिवाल ट्रस्ट, सकाळ रिलीफ फंड, सेट्रीज कंपनी, रीलफॉर फाउंडेशन आदी संस्थांच्या सहकार्यातून ओढे-नाले व बंधाऱ्यांचे खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. यंदा पावसाळ्यापूर्वीच जलस्त्रोत पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पाणीप्रश्न सुटला असून, सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वाल्हे परिसरातील वाड्यावस्त्यांना दरवर्षी तीव्र पाणीचंटाईचा सामना करावा लागतो उन्हाळ्यात टँकरवरच तहान भागवावी लागते. गतवर्षी
तालुक्यामध्ये सर्वात अगोदर येथील गायकवाडवाडी, बाळाजीचीवाडी, मोरूजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी आदी वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. दुष्काळावर शाश्वत उपाययोजनेसाठी वाल्हे, आडाचीवाडी, वागदरवाडी परिसरात पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्यातून जलसंधारणाचे काम हाती घेतले होते. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्याने कोट्यवधी लिटर पाणीसाठा होणार होता.
दरम्यान, दरवर्षीपेक्षा यंदा लवकर पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील सर्व ओढे-नाले, बंधारे ओव्हरफ्लो होऊन वाहत झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकेचा पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही सुटला आहे. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजनेसाठी जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सकाळ रिलीफ फंडाचे ग्रामस्थ आभार मानत आहेत.
जलसंधारणाच्या व्यापक चळवळीसाठी सकाळ रिलीफ फंडाकडून होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. वाल्हे पंचक्रोशीत ओढे-नाल्यांसह बंधाऱ्यांचे खोलीकरणाने मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असल्याचा विश्वास माजी सरपंच दत्तात्रेय पवार, अमोल खवले यांनी व्यक्त केला.
04746
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.