वाल्ह्यात रुळावर तरुणाचा मृतेदह
वाल्हे, ता. ३ : पुणे- मिरज रेल्वे मार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) ते दौंडज दरम्यान जाणाऱ्या रेल्वे रुळावर मंगळवारी (ता. १) सायंकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेची धडक बसली की त्याने आत्महत्या केली, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. या अनोळखी तरुणाचे वय अंदाजे ३० त ३५ वर्षे आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, पुण्याहून मिरजकडे निघालेल्या हमसफर एक्स्प्रेसचे लोकोपायलट सुमन कुमार यांना
मंगळवारी सायंकाळी ८च्या सुमारास वाल्हे -दौंडज हद्दीतील रेल्वेच्या रुळावर अज्ञाताचा मृतदेह आढळला. रेल्वेचे ट्रॅकमन अमोल भुजबळ यांनी ही माहिती वाल्हे पोलिस औट पोस्टला दिली. माहिती मिळाल्यावर वाल्हे पोलिस औट पोस्टचे हवालदार प्रशांत पवार हे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. या व्यक्तीचे वय अंदाजे ३५ असून, त्याची उंची साधारण ५ फूट ३ इंच आहे. रंग सावळा असून अंगात निळा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पँट आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस
निरीक्षक केशव जगताप हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.