वाल्ह्यातील शिबिरात ११२३ जणांचे रक्तदान

वाल्ह्यातील शिबिरात ११२३ जणांचे रक्तदान

Published on

वाल्हे, ता. २७ : येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला तरुणांसह महिलांचादेखील मोठा प्रतिसाद लाभला. रक्तदानासाठी तालुक्यातील युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या उस्फूर्त सहभागामुळे शिबिरात एकूण ११२३ बाटल्या रक्तसंकलन झाले.
रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यापार्श्वभुमीवर रविवारी (ता. २७)
वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्‍घाटन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, तनुजा शहा, सूर्यकांत पवार, अशोक बरकडे, अमोल खवले, सत्यवान सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले, गोरख कदम, मनोज भुजबळ, वागदरवाडीचे माजी उपसरपंच सचिन पवार, संतोष भुजबळ, शंकर भुजबळ, कांचन निगडे, नीलेश कुदळे आदी उपस्थित होते.
आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांना स्पोर्ट शूज, शालेय बॅग, हेल्मेटचे मोफत वाटप केले. तसेच, वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. महिलांसाठी विविध उपक्रमांचा मेळावा
देखील आयोजित केला होता.
या शिबिराला उत्तम धुमाळ, विराज काकडे, दत्ता झुरंगे, मोहन जगताप, गणेश निकुडे, वामन जगताप, अमित झेंडे, सचिन लंबाते, राजेश चव्हाण, गणेश जगताप, गणेश निकुडे, नाना सस्ते, कैलास जगताप, राहुल गायकवाड यांनी भेट दिली. महारक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी संतोष दुर्गाडे, पवन दुर्गाडे, चेतन रासकर, विशाल दुर्गाडे, अभिषेक दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, विठ्ठल चव्हाण, दादासाहेब मदने, प्रशांत भुजबळ, स्वप्निल भुजबळ आदींनी मेहनत घेतली.
वाल्हे येथील सरपंच अतुल गायकवाड यांनी प्रास्ताविक; तर दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com