वाल्ह्यात मांज्यात अडकलेल्या कावळ्याला जीवनदान
वाल्हे, ता. २ : येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या मागील शेतात मंगळवारी (ता.२) सकाळी पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या एका कावळ्याची सुटका झाली. मांज्यात पाय व पंख अडकून कावळ्याची हालअपेष्टा सुरू असताना दोन वन्यप्रेमींनी त्याची यशस्वी सुटका केली.
अन्नपाण्याच्या शोधात एक कावळा मंगळवार सकाळी साडेसातच्या सुमारास विद्युतवाहक तारेवर बसला होता. उडी मारताना त्याचे पाय व पंख मांज्यामध्ये अडकले आणि तारेवरून खाली मांज्यामध्ये लटकला. बराच वेळ त्याची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. वाल्हे (ता.पुरंदर) येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयाच्या पाठीमीगल शेतात सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पाय व पंख मांज्यामध्ये अडकल्याने कावळ्याला उडता न आल्याने तो तारेवरील दोऱ्यामध्ये लटकला गेला. कावळ्याची जीव वाचविण्यासाठी चाललेली धडपड शेजारील कृष्णा आनंदी अपार्टमेंटमधील रहिवासी निहाल कुदळे, प्रथमेश गार्डी यांनी पाहिली. याबद्दल त्यांनी मोबाईलवरून प्राणीमित्रांना कळवलं मात्र कावळ्याची चाललेली धडपड पाहून निहाल कुदळे यांनी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मदने यांना याबाबत सांगितले. यावर मदने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कावळ्याच्या शेजारी पोहोचले. मात्र, कावळा मांज्यामध्ये अडकल्याने त्या सभोवती मोठ्या संख्येने कावळे जमा झाले होते. मदने व कुदळे यांनी मोठ्या दक्षतेने काठी व कात्रीच्या साहाय्याने मांज्यातुन कावळ्याला अलगद सोडवले. कावळ्याचे पाय व पंख मांज्यामध्ये अडकल्याने मोठा गुंता झाला होता. मदने व कुदळे यांनी तो गुंता सोडवून कावळ्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.