वाल्हे परिसरात जिओची सेवा विस्कळित
वाल्हे, ता. ८ : वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
परिसरातील बहुतांश भागामध्ये जिओ कंपनीची सेवा विस्कळित झाल्याने फोन न लागणे, फोन आल्यानंतर किंवा केल्यानंतर आवाज अस्पष्ट येणे आदी अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सत्यवान सूर्यवंशी, शांताराम दुर्गाडे, प्रा. संतोष नवले आदींनी सांगितले.
गेले आठ दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा अचानक ठप्प झाल्याने जिओ ग्राहक अनेक सेवांचा वापर करू शकले नाहीत. सुरवातीला
आपल्याच भागातील रेंज गेल्याचा समज होऊन अनेकांनी आपले मोबाईल रिस्टार्ट करून पाहिले. मात्र, वाल्हे गावठाणातील काही भागासह अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, गायकवाडवाडी, सुकलवाडी, कामठवाडी, माळवाडी आदी भागातील ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्याचे समोर आले. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
रात्री- अपरात्री शेतकऱ्यांना इतरांशी संपर्क होत नाही. नेटवर्कअभावी मोबाईल बॅकिंगसह इतर इंटरनेट सेवांचा लाभ ग्राहक घेऊ शकत नाही.
ऐन सुट्टीच्या कालावधीत जिओचे नेटवर्क बंद पडल्याने ग्राहकांचे जीवन व्यावहारिकपणे ठप्प झाले. या नेटवर्क खंडणामागे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत अनेक जिओ ग्राहक दुसऱ्या कंपनीमध्ये कार्ड पोर्ट करणार असल्याचे वाल्हेचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, प्रा. संतोष नवले यांसह प्रगतशील शेतकरी विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.