पिंगोरीच्या सुयोग शिंदे याची लेफ्टनंट पदावर निवड
वाल्हे, ता ७ : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील सुयोग संदीप शिंदे यांची भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ पदावर निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे पिंगोरीच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. आता सुयोग याची यशोगाथा या परंपरेला नवी उंची देते आहे. त्यांनी सलग
१० वेळा अपयशाचा सामना करतानाही हार न मानता प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर देशसेवेची संधी मिळवली. त्याची ही वाटचाल तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुयोग याचे प्राथमिक शिक्षण पिंगोरी, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी एसएसबी
परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यदलातून नुकतीच निवृत्ती घेतली असून, त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत सुयोग याला सैन्यात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. मात्र, पदवी पूर्ण नसल्याने त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर यशाला गवसणी घातली.
या उल्लेखनीय निवडीनिमित्त सोमवारी (ता. ६) संध्याकाळी पिंगोरी गावांतर्गत सजवलेल्या पारंपरिक बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर सरपंच संदीप यादव, वाघेश्वरी देवस्थान कमिटी अध्यक्ष पोपट शिंदे, माजी सैनिक अरुण शिंदे यांच्या हस्ते सुयोग याचा नागरी
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम शिंदे, उद्योजक लक्ष्मण कदम, पोलिस पाटील राहुल शिंदे, सत्यवान भोसले, वीरपत्नी छाया शिंदे, वसंत शिंदे, कल्पना शिंदे, गोरख शिंदे, दत्ता शिंदे, धनंजय शिंदे, रूपेश यादव, सागर धुमाळ, अमोल शिंदे, प्रवीण शिंदे, सुनील शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी सुयगची आई नयना शिंदे व वडील सेवानिवृत्त भारतीय सैनिक संदीप शिंदे यांचा देखील ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात
आला. रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. देवस्थानचे उपाध्यक्ष वसंत शिंदे यांनी आभार मानले.
सतत अपयश आलं तरी मी प्रयत्न करतच राहिलो. दरवेळी काहीतरी शिकायला मिळालं. शेवटी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झाले.
- सुयोग शिंदे, लेफ्टनंट
05409
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.