आडाचीवाडीला यशदा प्रशिक्षण पथकाची भेट
वाल्हे, ता ८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत यशदा, पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या परराज्याच्या पथकाने बुधवारी (ता. ८) आडाचीवाडी (ता. पुरंदर) गावाला भेट देत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली.
शासकीय निधीचा योग्य, पारदर्शक आणि लोकाभिमुख वापर करून ग्रामस्थांनी उभा केलेला विकास पाहून पाहणी पथकाने या गावाचे विशेष कौतुक केले. या कामांची कार्यपद्धती आणि गावकऱ्यांची एकजूट इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत पथकातील उपसंचालक संजयकुमार सिंग यांनी व्यक्त केले. अभियानाचे राज्य प्रवर्तक आदरणीय मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार पथकाने गावाला भेट दिली.
या पथकामध्ये जिल्हा जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार, सहाय्यक विकास अधिकारी राजवीर सिंह, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय बहादूर मौर्य, मधू चौधरी, बबली देवी, यशदा मार्गदर्शक वसंत राजुदकर आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच मोहन पवार, सूर्यकांत पवार, प्रशांत पवार, अरविंद पवार, हनुमंत पवार, अभिजित पवार, सूरज पवार, अलका पवार, फुलचंद पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतानंतर पथकाने ग्रामस्थांशी संवाद साधून गावांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यात पथकाने गावात फेरफटका मारून जलव्यवस्थापन, पाणंद रस्ते, वृक्षारोपण, बोलक्या भिंती, स्वच्छता उपक्रम, व्यायामशाळा, नाना- नानी पार्क, स्मशानभूमी आदी कामांची पाहणी केली.
यशदा पथकातील सदस्यांनी नमूद केले की, आडाचीवाडी सारख्या लहान गावाने विकासाचा असा ठसा उमटवणे हे केवळ कौतुकास्पदच नाही, तर इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभाग, नियोजन, आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या तिन्ही पातळीवरील कामगिरीचे विशेष कौतुक केले. ग्रामपंचायत अधिकारी अनिल हिरास्कर यांनी आभार मानले.
या भेटीच्या माध्यमातून आडाचीवाडी हे गाव समृद्ध ग्रामविकास या संकल्पनेचं प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे. शासकीय निधी मिळाल्यानंतर तो केवळ खर्च न करता, गावाच्या दीर्घकालीन गरजांना प्राधान्य देऊन कामे केली तर खऱ्या अर्थाने समृद्ध पंचायत साकारता येते, हे आडाचीवाडीने दाखवून दिले आहे.
- मनोज कुमार, जिल्हा जनसंपर्क अधिकारी
05420
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.