गुळूंचे येथे काटेबारसेसाठी महावितरण सज्ज

गुळूंचे येथे काटेबारसेसाठी महावितरण सज्ज

Published on

वाल्हे, ता. ३० : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रसिद्ध श्री ज्योतिर्लिंग व ज्योतिबा काटेबारस यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर महावितरण नीरा शहर शाखेने वीजपुरवठा अखंड ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. या निमित्ताने महावितरणच्या वतीने उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच ट्रान्स्फॉर्मरची तपासणी व स्वच्छता करण्यात आली. तसेच विद्युत वाहिन्यांच्या शेजारील अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटून सुरक्षेची आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
गुरुवारी (ता. ३०) सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार व सहाय्यक अभियंता अलीम मणियार यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर कामे पार पडली. या कामात महावितरणचे नितीन मोरे, धनंजय कदम, सचिन बडे, नवनाथ काकडे, महेश निगडे, अमित भोसले आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गुळुंचे येथील बारादिवसीय यात्रा उत्सवाला नुकताच प्रारंभ झाला असून, रविवारी (ता. २) यात्रेचा मुख्य दिवस काटेबारस उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी गुळुंचे येथे दाखल होतात.

भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने सर्व पूर्वतयारी पूर्ण केली असून सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या काळात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून विशेष नियंत्रण पथक नेमले असून, वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी २४ तास पर्यवेक्षण व्यवस्था ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com