‘सोमेश्वर’कडून ३३०० रुपये प्रतिटन उचल

‘सोमेश्वर’कडून ३३०० रुपये प्रतिटन उचल

Published on

सोमेश्वरनगर/वाल्हे, ता. १ : सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामात ३३०० रुपये प्रतिटन उचल दिल्याबद्दल व अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सलग १२ वर्षे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मांडकी व परिसरातील सभासद शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १) जगताप यांचा कारखान्यावर सत्कार केला.
सोमेश्वर कारखान्याने जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस दराची कोंडी फोडत एकरकमी एफआरपी प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे अदा केली आहे. गतहंगामप्रमाणे दोन टप्पे करणे यावर्षी कारखान्याने टाळले. यामुळे कार्यक्षेत्रात शेतकरी समाधानी झाला आहे. तसेच, २६ नोव्हेंबरला जगताप यांच्या सोमेश्वरच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीस १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सोमवारी मांडकीतील शेतकरी, मांडकी सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे आजी- माजी संचालक मंडळ यांनी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जगताप यांचा सत्कार केला.
याप्रसंगी सोमेश्वरचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक जितेंद्र निगडे, माजी संचालक मोहन जगताप, मांडकी पाणीसंस्थेचे अध्यक्ष छगन जगताप, उपाध्यक्ष अंकुश जगताप, उमेश मांडके, माणिक मोरे, दशरथ जगताप, प्रवीण जगताप, दिलीप जगताप, माजी उपसरपंच विश्वास जगताप, शिवाजी मोरे, तेजपाल सणस आदी सभासद उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने दैनंदिन गाळपक्षमता, साखर उतारा यामध्ये केलेली वाढ, कारखान्याचे व उपपदार्थ यांचे विस्तारीकरण आणि आर्थिक स्थैर्य या बाबींचे शेतकऱ्यांनी कौतुक केले. तसेच, मांडकी पाणीपुरवठा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व माजी संचालक मोहन जगताप यांनी शेतकऱ्यांना वेळेवर देयके देत असल्याबद्दल व ऊस उत्पादकांसाठी उपक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

चालू हंगामातही उच्चांकी दराची परंपरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने छोट्या कारखान्याचा उद्योगसमूह केला आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कारखान्यास पुरेसा ऊस पुरवावा, एआय तंत्रज्ञान वापरावे. तसेच, कुठल्याही आमिषाला बळी न पडता सोमेश्वर कारखान्यासच ऊस घालावा. वाडवडिलांनी उभारलेल्या सहकारी संस्था आवर्जून जपल्या पाहिजेत, असे आवाहन जगताप यांनी केले. तसेच, चालू हंगामातही उच्चांकी दराची परंपरा राखणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

05849, 05850

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com