‘आडाचीवाडीकरांची एकजूट प्रेरणादायी’
वाल्हे, ता. ७ : ग्रामस्थांनी एकजूट दाखवून केलेला सहभाग अत्यंत प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्दिष्ट गावाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवणे आहे आणि आडाचीवाडीने दाखवलेली सक्रियता हे या अभियानाचे खरे यश आहे. अशा सहभागामुळे गावाचा विकास वेगाने आणि सुसंगतरीत्या होईल, अशा विश्वास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे जनक, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक व यशदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला.
आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. ७) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने विविध विकासकामांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे जनक, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक व यशदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी कलशेट्टी बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, मुंबईच्या उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के, गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ, शालिनी पवार, सरपंच सुवर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विक्रम काळे, सूर्यकांत पवार, अथर्व पवार, उपसरपंच मोहन पवार, पोपट पवार,प्रशांत पवार, वाल्हे मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर, तलाठी सागर पाटील, ग्रामसेवक अनिल हिरास्कर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासूनच संपूर्ण गाव एकजुटीने विकासकामांच्या पाहणीसाठी सरसावले, आणि उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी उत्साहाने भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पाडला. पाणंद रस्ते, जलसंधारणाची कामे, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, अद्ययावत व्यायामशाळा आणि गावांतर्गत रस्त्यांसह इतर भौतिक सुविधांची पाहणी करून काही विकासकामांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नातून सुरू केलेल्या कामांनी गावात वेगळा ठसा उमटवला आहे. जलसंधारण, पाणीपुरवठा, रस्ते, स्मशानभूमी व व्यायामशाळा यामध्ये घेतलेला सहभाग पाहून अत्यंत समाधान वाटते. हीच एकजूट गावाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि गावाची एक वेगळी ओळख निर्माण करणार आहे.
-गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
5930
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

