सुकलवाडी शाळेमध्ये भरला आठवडे बाजार

सुकलवाडी शाळेमध्ये भरला आठवडे बाजार

Published on

वाल्हे, ता. २७ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यावहारिक अनुभव मिळावा, यासाठी शुक्रवारी (ता. २६) आठवडे बाजाराचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाल्याचे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. या माध्यमातून त्यांनी व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला आणि विक्री कौशल्याचा अनुभव घेतला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सुकलवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका रूपाली जगदाळे यांनी सांगितले. या वेळी सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच संदेश पवार, उद्योजक राहुल यादव, धनंजय पवार, राजेंद्र चिकणे, दिलीप पवार, देवेंद्र सातपुते, अनिल सुर्वे, वनिता पवार, कुलकर्णी, सुवर्णा चव्हाण, संगीता पवार, अंगणवाडी सेविका उषा पवार, पूनम पवार, प्राजक्ता पवार आदी उपस्थित होते.
ग्रामस्थ व महिलांनी विविध भाजीपाल्याची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या विक्री कौशल्याचे कौतुक केले. याववेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाल्यासोबतच विविध खाद्यपदार्थांचेही स्टॉल लावले होते. ज्यामुळे बाजारात अधिक रंगत आली. सहशिक्षक धनाजी मोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com