सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी समाजाने हात पुढे करा

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी समाजाने हात पुढे करा
Published on

वाल्हे, ता. १६ : ‘‘सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून समाजाने त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे,’’ असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करताना केले.
शुक्रवार (ता. १६) वाल्हे (ता. पुरंदर) महर्षी वाल्मीकी विद्यालयात देशभक्तीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी सुमेधा योगेश चिथडे
यांचा यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी चिथडे बोलत होत्या. अ‍ॅड. विद्या नामदेव भुजबळ यांच्या पुढाकारातून
कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे होते. याप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, प्रा. नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत, ज्योती एडके, माजी सरपंच विमल भुजबळ, अंकुश माळवदकर, रज्जाकभाई पानसरे, दामोदर पवार, साईनाथ चव्हाण, संजय ढावरे, सुचिता हिंगणे, सारिका बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी चिथडे यांनी सांगितले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून १९९९ मध्ये पती योगेश चिथडे यांच्या सहकार्याने ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेमार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना आर्थिक, शैक्षणिक आणि मानसिक आधार देणे तसेच वीरनारींना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
भारतीय सैनिकांसाठी केलेल्या ठोस उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सियाचिन, लेह, लडाख आणि जम्मू-काश्मीरसारख्या अतिदुर्गम
भागात देशातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला. कठीण हवामानात लढणाऱ्या जवानांना हे प्रकल्प मोठा आधार देतात. आमचे कार्य हे
त्यांच्यासाठी कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

सैनिकांसाठी अखंड सेवाभाव जपणाऱ्या चिथडे यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे अॅड. विद्या नामदेव भुजबळ यांनी सांगितले.


फाउंडेशनला भरभरून प्रतिसाद
दरम्यान कार्यक्रमानंतर चितळे यांच्या मार्गदर्शनानंतर चिथडे यांच्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनला महर्षी वाल्मीकी विद्यालय, ॲड. विद्या नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत, यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वरूपात मदत फाउंडेशनला केली.
पर्यवेक्षिका नाजमिन अत्तार प्रास्ताविक केले. शैला गवारी यांनी सूत्रसंचालन केले. सुदामा गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com