वाल्हेतील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये हळदी-कुंकू

वाल्हेतील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये हळदी-कुंकू
Published on

वाल्हे, ता. २७ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील आदिनाथ संस्कार प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शनिवारी (ता. २४) हळदी-कुंकू आणि स्नेहमेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता, महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे बोरन्हाण झाले. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. याचबरोबर पालक मेळावा घेण्यात आला असून पालक आणि शाळा यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. हळदी-कुंकू समारंभाच्या वेळी महिला पालकांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. त्यामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आपुलकी व स्नेहभाव वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते, ज्योती भुजबळ, रश्मी पवार, दीपाली कुदळे, विनया लंबाते, राणी शहा, प्रियांका शहा, अर्चना नेवसे आदींसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
पूर्वप्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, परंपरा व सामाजिक मूल्यांची ओळख निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्‍वास वाढतो. तसेच पालक आणि शाळा यांच्यातील सहभागात्मक नाते अधिक दृढ होते. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळेसाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्याध्यापिका ज्योत्स्ना जाधव यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका रूपाली कदम, रेखा दुर्गाडे, अलका जाधव आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com