दुर्गाडे कुटुंबात २८ वर्षांचा सुवर्णयोग

दुर्गाडे कुटुंबात २८ वर्षांचा सुवर्णयोग

Published on

वाल्हे, ता. ९ : पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील दुर्गाडे कुटुंबाने जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा इतिहास रचला आहे. अजितदादा पवारांच्या पाठिंब्यावर १९९७ मध्ये डॉ. दिगंबर दुर्गाडे वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते आणि ते त्या काळातील सर्वात तरुण सदस्य ठरले होते. तब्बल २८ वर्षांनंतर त्यांची मुलगी डॉ. प्राजक्ता दुर्गाडे ही सुद्धा आताच्या निवडणुकीत अजितदादांच्याच आग्रहाने २८ व्याच वर्षी सदस्य म्हणून निवडून आली आहे. अजित पवारांच्या प्रेमामुळे दुर्गाडे कुटुंबात हा दुर्मिळ योग आला आहे.
आज जिल्हा परिषदेच्या लागलेल्या निकालात दंतचिकित्सा असलेली डॉ. प्राजक्ता दुर्गाडे निवडून आली आहे. यात विशेष म्हणजे दोन्ही पिढ्यांमध्ये वयाचा योगायोग सारखाच ठरला असून, ‘२८’ हा आकडा दुर्गाडे कुटुंबासाठी नशिबाचा ठरल्याची चर्चा होत आहे. या निवडीमुळे तरुण वर्गात राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची ऊर्जा वाढली असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना शारदानगर शिक्षणसंस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत असताना अजित पवार यांनी सामाजिक गुण हेरून कुठलीही पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषदेवर संधी दिली होती. सध्या पुणे जिल्हा ते बँकेचे अध्यक्ष असून, सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय उपक्रम सुरू असताना अटीतटीच्या लढतीत त्यांच्या कन्येच्या निवडीमुळे तरुण वर्गात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. प्राजक्ता हिला सुद्धा अजितदादा यांच्या आग्रहामुळे डॉक्टरकी करता करता अचानक उमेदवारी मिळाली. आता मतदारांनी या निवडीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे संदेशही यामध्ये स्पष्ट झाले आहेत. कमी वयात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याने परिसरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांना नेतृत्वाच्या संधी देण्याचा मतदारांचा संदेश यामधून ठळकपणे पुढे आला आहे. या निवडणूक निकालामुळे तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात ‘२८’ हा आकडा दुर्गाडे यांच्यासाठी भाग्यवान ठरल्याची चर्चा रंगली आहे.

आई प्राथमिक शिक्षिका, मुलगी जिल्हा परिषद सदस्य...
वाल्हे जवळील माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आई स्वाती दुर्गाडे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्याच घरातील कन्या आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याने गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. यावेळी ‘आता मुलगीच आईची बॉस झाली’ अशी मिश्कील चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. आईच्या सेवाभावी वाटेवर चालत मुलीने लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली झेप सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com