सुकलवाडीमध्ये एनसीडी तपासणी शिबिर

सुकलवाडीमध्ये एनसीडी तपासणी शिबिर

Published on

वाल्हे, ता. १३ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. १३) वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एनसीडी (असंसर्गजन्य आजार) तपासणी शिबिर घेण्यात आले. तीस वर्षांवरील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरामध्ये बीपी, रक्तातील साखरेची पातळी (शुगर), वजन, उंची तसेच हिमोग्लोबिन (एच.बी.) तपासणी करण्यात आली. यामध्ये ६४ लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः जीवनशैलीशी संबंधित आजारांचे लवकर निदान व्हावे आणि योग्य उपचार वेळेत मिळावेत या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाचे उद्‍घाटन सरपंच संदेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिगंबर पवार, सदाशिव पवार, संजय चव्हाण, देवराम सातपुते, शांताबाई सुर्वे, बोलचंद पवार, वर्षा सुर्वे, शंकर कोंढाळकर, लीलावती पवार, दिव्या कुंभारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
‘‘नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संदेश पवार यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.’’ असे माधुरी पवार यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तेजस्वी पवार, जयश्री काळे यांनी तपासण्या केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com