नीरा येथे शिवरायांना अभिवादन
वाल्हे, ता. २० : नीरा (ता. पुरंदर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेमधील पुतळा परिसर फुलांची आरास, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता.
माजी सरपंच तेजश्री काकडे, पुरंदर तालुका नोटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आदेश गिरमे, तसेच वसंतराव दगडे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी उपसरपंच राजेश काकडे, उद्योजक संदीप धायगुडे, राजेंद्र बरकडे, योगेंद्र माने, बाळासाहेब भोसले, प्रमोद काकडे, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, विजय शिंदे, अनंता शिंदे, अजित सोनवणे, राहुल जेधे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २०) पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
06501
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

