‘बालविवाह मुक्ती रथ’द्वारे नीरा येथे जनजागृती

‘बालविवाह मुक्ती रथ’द्वारे नीरा येथे जनजागृती

Published on

वाल्हे, ता. २१ : नीरा (ता. पुरंदर) येथे शनिवार (ता.२१) महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पुणे यांच्या वतीने ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्रासाठी १०० दिवस संकल्प अभियान’ राबविण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी बालविवाहाला आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभियानांतर्गत नीरा परिसरामध्ये प्रसार रथाद्वारे विशेष जनजागृती फेरी काढण्यात आली. रथावरील घोषवाक्यांच्या माध्यमातून बालविवाहाविरोधी संदेश देण्यात आला. शाळा, ग्रामपंचायत परिसर तसेच वाडी-वस्त्यांवर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ‘या या सारे मिळूनी बालविवाह मिटवूया, बालकांना त्यांचे अधिकार मिळवून देऊया’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. बालविवाहाचे सामाजिक व कायदेशीर परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि शासनाच्या विविध संरक्षणात्मक योजना याबाबत माहितीपत्रके वाटप करून नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. प्रसार रथावरील फलकावर ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी आपला ठाम पाठिंबा नोंदविला. याप्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रमुख ॲड. सुरेखा कांबळे, जिल्हा महिला व बाल विकास पर्यवेक्षिका सारिका लोखंडे, समन्वयक कालिचरण पाटोळे, मनिषा जाधव, सुनीता थोरात, माधुरी मोठे, सुवर्णा भोज, शीतल जाधव, सुजाता जावळे, लक्ष्मी चांदगुडे आदी उपस्थित होते.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रमुख ॲड. सुरेखा कांबळे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करताना बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान यावेळी उपस्थितांनी बालविवाह न करण्याची व समाजात त्याला विरोध करण्याची सामूहिक शपथ घेतली. या अभियानामुळे परिसरात बालविवाहाविषयी जागरूकता निर्माण होऊन समाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com