अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा

अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा

Published on

वाल्हे, ता. २४ : वाल्हे (ता.पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील पूर्वेकडील अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. अंबाजीचीवाडी, मुदकमवाडी, सुकलवाडी तसेच गायकवाडीतील परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व त्यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात आल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती व पशुधनासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण सन १९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून करण्यात आले होते. त्या दुष्काळी काळात स्थानिकांनी श्रमदान करून हा तलावा उभारला. खोलीकरणामुळे लाखो लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. ज्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी येथे जमा होऊन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले व ओसंडून वाहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, यावर्षी पावसाळ्यापूर्वीच तलाव कोरडा पडल्याने परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

सध्या विहिरी व कूपनलिकांमध्ये फक्त एक महिना ते दीड महिन्याचे पाणी शिल्लक असून त्यानंतर नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. फेब्रुवारीतच पाणी संपल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार.
- तुकाराम पवार, शेतकरी, अंबाजीचीवाडी


विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने जेमतेम एक दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.
- वनराज पवार, शेतकरी मुकदमवाडी

06543

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com