महर्षी वाल्मिकी विद्यालयाच्या
२१ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश

महर्षी वाल्मिकी विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश

Published on

वाल्हे, ता. १ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयातील २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षीच्या एनएमएमएस परीक्षेत आर्यन भुजबळ (११३ गुण), अपूर्व तोरस्कर (१०७ गुण) आणि शुभम जाधव (९३ गुण) यांसह २१ विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले. या विद्यार्थ्यांना अनिल दुर्गाडे, लक्ष्मण भालसिंग, सुनिल ढवळे, सोनाली पाटील, किर्ती लंभाते आदींनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे पश्चिम विभागीय सदस्य डॉ. दिगंबर दुर्गाडे, शाळा समितीचे सदस्य गिरीश पवार, प्रमोद शहा, माजी विद्यार्थी महामेळावा अध्यक्ष प्रा. अनिल कुंभार, सरपंच अतुल गायकवाड आणि विद्यालयाचे प्राचार्य सतिश निगडे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com