नीरा तसेच वाल्हे परिसरामध्ये मटन, चिकन खरेदसाठी गर्दी

नीरा तसेच वाल्हे परिसरामध्ये मटन, चिकन खरेदसाठी गर्दी

Published on

वाल्हे, ता. ३ : सर्वत्र होळीच्या रंगांच्या धूमधडाक्यात रंगोत्सवाच्या आनंदाचा शिगेला पोहचलेला असताना, नीरा तसेच वाल्हे परिसरातील (ता. पुरंदर) मटण आणि चिकन विक्रीच्या दुकानांमध्ये धुलवडीच्या निमित्ताने खवय्यांची मोठी गर्दी दिसून आली. होळीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहारी पदार्थांचा पारंपरिक विशेष आकर्षण असते. त्यामुळे यावर्षीही चिकन, मटण आणि इतर मांसाहारी पदार्थांची विक्री चांगली झाली.
यंदा ग्रहणाचा प्रभाव दिसून आल्याने मागणीमध्ये काहीशी घट झाली आहे. याबाबत विक्रेते गोरख कदम यांनी सांगितले की गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्राहकांची गर्दी कमी होती, तरीही चिकन आणि मटणाच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाली. चिकन २५० रुपये किलो आणि मटण ८०० रुपये किलो या दराने विक्री सुरू होती.
नीरा येथील जितेंद्र जठार यांनी सांगितले की ग्रहणामुळे काही घट झालेली असली तरी सुट्टीच्या दिवशी मांसाहारी पदार्थांची खरेदी थांबली नाही. खवय्यांनी धुलवडीचा उत्सव रंगोत्सवाच्या आनंदात जशाच्या तशा साजरा केला. काही ग्राहकांनी घरच्या स्वयंपाकघरात मांसाहाराची तयारी केली, तर तरुणवर्ग हॉटेलमध्ये जाऊन धुलवडीचा आनंद घेत होता.धुलवडीला सुट्टीचा दिवस असल्याने मांसाहाराच्या तयारीत खवय्यांनी उत्साहीपणे सहभाग घेतला परंतु ग्रहणामुळे मागणी थोडी कमी झाली तरीही ग्राहकांची तुरळक गर्दी दुकांनावर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com