वाल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

वाल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
Published on

वाल्हे, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त वाल्हे (ता. पुरंदर) येथे उदयगिरी सोशल फाऊंडेशन, सदगुरूसेवा ट्रस्ट आणि संदीप दाते मित्र परिवार यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राम माने होते.
याप्रसंगी सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सागर भुजबळ, माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते, सचिन म्हेसे, पार्थसारथी बलसुरकर, धनश्री कसेकर, सतीश पवार, दीपाली नलावडे, नम्रता आगलावे, गीता नागरे, साक्षी पवार, तृप्ती दाते, दिगंबर दाते यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आली.
कार्यक्रमा दरम्यान साई पद्मश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा राधिका घोरपडे, जेजुरी येथील पोलिस उपनिरीक्षक दीपाली पवार, पुणे माध्यमिक पतपेढीच्या माजी अध्यक्षा विद्या पवार, पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील ॲड. प्रिया दरेकर, पुणे माय मराठी संघ अध्यक्षा कल्पना शेरे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. सचिन दुर्गाडे यांनी प्रास्ताविक केले. स्वप्निल बरकडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com