पिंगोरीतील आगीत ठिबक सिंचन यंत्रणा नष्ट
वाल्हे, ता. ९ : पिंगोरी (ता.पुरंदर) परिसरातील खासगी माळरान व डोंगरावर रविवारी (ता. ८) सायंकाळी वणवा लागला. या आगीत माळरानावरील पाच एकरातील ठिबक सिंचन यंत्रणा जळून नष्ट झाली तसेच जनावरांसाठी ठेवलेले गवतही खाक झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिंगोरी येथील माळरानावर शेतकऱ्यांनी विविध रोपांची लागवड केली होती. त्यास ठिबकद्वारे पाणी देण्यात येत होते; मात्र अचानक लागलेल्या आगीत ठिबक यंत्रणा नष्ट झाली. येथील यादववस्ती भागात लागलेल्या आगीवर तरुणांनी धाडसाने नियंत्रण मिळवले. रूपेश यादव, अनिकेत यादव, विशाल यादव, आदित्य यादव, मयूर यादव, स्वप्नील यादव, दत्ताराम यादव, कृष्णा यादव, राजेंद्र गायकवाड, नवनाथ यादव, हनुमंत यादव तसेच पिंगोरीचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, पिंगोरी, जेजुरी, दौंडज, साकुर्डे, परिंचे, वाल्हे, गुळूंचे, राख, कर्नलवाडी परिसरात अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामसुरक्षा दलाप्रमाणे प्रत्येक गावात ‘वनसुरक्षा दल’ स्थापन करून आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. आत्तापर्यंत वन समित्या केवळ कागदोपत्री आहेत आणि प्रत्यक्षात तरुणांना सहभागी केले जात नाही, असे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी सांगितले.
आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडे यंत्रणा नाही. वनविभागाकडून प्रशिक्षण किंवा जनजागृती होत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात स्वतंत्र आग
क्षमविण्यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.
- संदीप यादव, सरपंच- पिंगोरी
06652
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

