फॉगरमुळे जनावरांना उष्णतेपासून दिलासा

फॉगरमुळे जनावरांना उष्णतेपासून दिलासा

Published on

वाल्हे, ता. ११ : उन्हाच्या काहिलीचा जनावरांनाही त्रास होत आहे. त्यामुळे पशुधनाचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील पशुपालकांनी अभिनव उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील माजी सरपंच अमोल खवले व पशुपालक सचिन खवले यांनी आपल्या जनावरांच्या शेडमध्ये फॉगर बसवून जनावरांना उष्णतेपासून दिलासा देण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे.
अमोल खवले यांच्या गोठ्यात १३ जनावरे असून सचिन खवले यांच्या गोठ्यात १५ जनावरे आहेत. वाढत्या तापमानामुळे जनावरांना त्रास होऊ नये तसेच गोठ्यातील वातावरण थंड राहावे यासाठी त्यांनी फॉगर प्रणाली बसवली आहे. या फॉगरमधून सूक्ष्म पाण्याचे तुषार पसरत असल्याने गोठ्यातील तापमान कमी राहते आणि जनावरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळतो.या उपक्रमामुळे जनावरांची तब्येत चांगली राहण्यास मदत होते, असे पशुपालक माजी सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.
फॉगरमधून पाण्याचे सूक्ष्म तुषार पसरत असल्याने गोठ्यातील वातावरण थंड राहते आणि जनावरांना उष्णतेपासून दिलासा मिळतो. त्यामुळे जनावरांची तब्येत चांगली राहण्यासही मदत होत असल्याचे सचिन खवले यांनी सांगितले.
फॉगरच्या प्रयोगामुळे उष्णतेच्या काहिलीपासून जनावरांचे संरक्षण करण्यास यश मिळाले असून, इतर पशुपालकांसाठी हा उपाय प्रेरणादायक ठरू शकतो, असे आवाहन वाल्हे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माणिक बनगर यांनी केले आहे.


06672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com