कानिफनाथ मंदिरात रंगला रंगपंचमी उत्सव

कानिफनाथ मंदिरात रंगला रंगपंचमी उत्सव

Published on

वाल्हे, ता. १२ : कामठवाडी (ता. पुरंदर) येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (ता. ११) फाल्गुन कालाष्टमीनिमित्त रंगपंचमी यात्रा उत्सव आनंदात पार पडला. या उत्सवात शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे फाल्गुन कृष्णपंचमी आणि कालाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील रंगपंचमी यात्रा उत्सव धार्मिक विधी व पारंपरिक उत्साह यांचा संगम ठरला. यामध्ये शेकडो भाविकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. यानिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. फाल्गुन कृष्णपंचमी रविवारी (ता. ८) मढी (ता. पाथर्डी) येथे कानिफनाथ व शेजारील मच्छिंद्रनाथ यांच्या यात्रोत्सवानिमित्त कामठवाडी ग्रामस्थांच्या वतीने विधीवत पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. चौथ्या दिवशी कालाष्टमीनिमित्त बुधवारी (ता. ११) कामठवाडी येथील श्री कानिफनाथ मंदिरामध्ये रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा संपन्न झाली.
सायंकाळी उत्सवमूर्ती श्री कानिफनाथ यांच्या पादुकांची आकर्षक सजविलेल्या पालखीतून पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगांची छबिना आणि उत्सवमूर्तींच्या अंगावर रंग शिंपण्याची परंपरा जपली गेली.
कानिफनाथ मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पुणे- पंढरपूर पालखी महामार्गाच्या
विस्तारीकरणासाठी जुने मंदिर पाडावे लागले होते आणि जुन्या मंदिराच्या जागेच्या पुढील बाजूस नव्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com