नीरा येथे कचरा डेपोचा धूर ठरतोय घातक
वाल्हे, ता. १२ : नीरा (ता. पुरंदर) येथील प्रभाग एक मधील परिसरात ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोवरील धुरामुळे नागरिक रोजच त्रस्त आहेत. सायंकाळी परिसरात धुराचे साम्राज्य पसरते जे घरात आणि रस्त्यावर देखील जाणवते. कचऱ्याच्या आगीतून निघणाऱ्या धुराचा वास नागरिकांचा श्वास गुंतवतो, ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
नीरा येथील प्रभाग एकमध्ये नीरा नदीच्या कडेला ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. या डेपोवरील कचऱ्याला आग लागून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असतो. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे. कचऱ्याच्या या धुरामुळे येथील प्रभाग एकमधील परिसरात सायंकाळी धुराचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळत आहे. नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर पडताना प्रभाग एकमधील नागरिकांना मात्र शुद्ध हवा दूरच कचरा डेपोतील धुराने त्यांचा श्वास कोंडला जातो. लहान मुले, वृद्ध आणि घरगृहिणींवर त्याचा परिणाम अधिक जाणवतो.
हा कचरा भंगारवाल्यांकडून जाणूनबुजून भंगार साहित्य गोळा करण्यासाठी जाळला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून वारंवार पाणी फवारून आग विझवली गेली आहे. मात्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागेची कमतरता असल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासन कचरा घंटागाडीद्वारे संकलन करायला सांगत आहे, परंतु संकलित केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन व त्यातील अडचणींवर योग्य मार्ग निघत नसल्याची खंत अनेक ग्रामपंचायतींना आहे. आम्ही लवकरच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम करत आहोत.
प्रभाग एकमधील नव्या वसाहतींमध्ये दर्जेदार घरं बांधली गेली आहेत; मात्र कचरा डेपोमधून निघणाऱ्या धुरामुळे घरांमध्येही त्रास होत आहे. नीरा शहरातून दररोज संकलित होणारा कचरा नदीशेजारील मोकळ्या जागेत ठेवला जातो. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याचे वर्गीकरण नीट न झाल्यामुळे समस्या कायम आहेत.
- राजेश काकडे, उपसरपंच
कचरा डेपोमधून येणाऱ्या धुरामुळे संपूर्ण परिसरात वास पसरतो यामुळे घसा आणि श्वसनाचे त्रास उद्भवण्याची संभाव्यता आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून तातडीने कार्यवाही करून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून या समस्येची विल्हेवाट लावावी, तसेच कोणीही कचरा जाळू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी.
- सलीम बागवान, रहिवासी
कचऱ्यातून काहीतरी भंगार किंवा इतर वस्तू घेण्याच्या हेतूने कोणीतरी कचरा जाळत आहे, हे ग्रामपंचायत प्रशासन सांगते. पण या धुरामुळे आमचा श्वास अक्षरशः कोंडला जातो.
- पुनम मोरे, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

